कोमेजलेल्या पाकळ्या!!!

Started by मिलिंद कुंभारे, May 10, 2013, 10:50:47 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


मित्रानो कधी कधी आपण खूपच मनापासून एखादी कविता लिहितो अन वाटतेय कि आपल्याला  भरपूर प्रतिसाद मिळेल! पण नेमके त्याच कवितेला शुन्य प्रतिक्रिया मिळतात अन मन आपलं निराश होतंय! असाच काहीसा आशय ह्या कवितेत एक विनोद म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आहे!

कोमेजलेल्या पाकळ्या!!!

कालच्या राती,
लिहिली मी कविता,
"गुलाबी पाकळ्या"!
वाटलं होतं,
मिळेल त्यावर,
भरपूर प्रतिक्रिया!
सकाळीच उठल्या उठल्या,
पोस्ट केली अन,
टक लावून बसलो,
स्क्रीनजवळ कॉम्पुटरच्या!
बघता बघता,
सांज झाली,
पण नाही मिळाली,
मज एकही प्रतिक्रिया!
वाटलं होतं,
आजतरी ऑनलाईन,
असेल मदुरा,
अन म्हणेल मला,
"मस्तच रे दादा",
अन देईल ठोकून,
चारोळी एक पुन्हा,
"वेड्या मना"!
वाटलं होतं,
भेटेल मजल,
केदार दादा,
अन म्हणेल,
क्या बात, वा वा!
वाटलं होतं,
आज अवतरेल,
रुद्रावतार,
नाही काही तर,
नुसतंच म्हणेल,
लिहायचं स्वातंत्र,
म्हणून लिहू नये,
काही पण!
कामाची व्यस्तता,
सारून बाजूला,
आज फिरकेन,
संतोषी ताई,
अन म्हणेल,
very nice,
I liked it
very much,
keep writing
and
keep posting!
शब्दांच्या शोधात,
भटकताना,
भटकेल एक शब्दवेडा,
अन म्हणेल आवडला,
श्रुंगार तुमचा,
मराठमोळा!
वाटलं होतं,
पेशंट संपले कि,
विक्रांत असतील ऑनलाईन,
अन म्हणेल मजला,
हा वृत्त जोडता,
खुलेल कविता!
कुणीच नाही तर,
येतील अम्बारीश काका,
अन म्हणतील मजला,
कवितेच्या नावाखाली,
गिरवलास  पुन्हा तू,
एक नवा धडा!
कल्लोळ झाला,
पुरे आता!
आता नाही राहला,
उत्साह मजला,
रसिकहो समजा,
हि माझी,
शेवटची कविता,
किंवा शेवटचा धडा!
मी हिरमुसला,
जिद्द संपली,
अन संपला,
खेळ शब्दांचा!
आजच्या राती,
जागून जागून,
लिहिली मी कचिता,
"कोमेजलेल्या पाकळ्या"!


मिलिंद कुंभारे 

केदार मेहेंदळे

tuh he komejlelya paklyanch parcle mala majhya navin pttyavar mialal......

Maddy_487

जिद्द संपली,
अन संपला,
खेळ शब्दांचा!
आजच्या राती,
जागून जागून,
लिहिली मी कविता 



एकदम झाक

कोणी नाही तरी मी देईन प्रतिक्रिया
आजच्या रात्री परत जागून लिहा अजून एक कविता ...  ;)

मिलिंद कुंभारे


mruganayani

khupach chan....kahi junya athavani punha jivanta zalya......

मिलिंद कुंभारे



sweetsunita66


मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे