अपुरी मैत्री..

Started by Rohit Dhage, May 11, 2013, 11:22:31 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage


मला तिच्याकडून काय पाहिजे होतं?
एकनिष्ठपणा? आपुलकी? सहवास? की दुसरंच काही.
हयातला दुसरा हा पार्ट सोडला तर बाकी सगळं पाहिजे होतं कदाचित.
आणि ह्या तिन्ही गोष्टींसाठी ती कुणापाशीही बांधील नव्हती. तिच्या BF बरोबर पण नाही.
एकनिष्ठपणा ती चौघात वाटून मोकळी झालेली.
आपुलकी कधी तिच्या डोळ्यात दिसायची, फावल्या वेळी कधी भेटली की.
तिच्या कामाच्या वेळी गेलं की तिच्यासाठी भरलेली कॉमेडी सर्कस वाटायची.
तिला कळायची ही डोळ्यांची भाषा. पहिल्यांदाच अशी कुणी पाहिलेली मी.
हुशार होती ती. नव्हे अतिहुशार! त्याला साजेसा attitude.
स्वत:हून कधीही कुणापाशी जाणार नाही, तिची एक मैत्रीण सोडली तर.
मठ्ठासारखं एका जागी बसून करमणूक करून घ्यायची. जो खुश करेल त्याच्याशी लगट.
तोही परका एकदा त्याचा show संपला की. दर दिवशी नव्याने सुरुवात. कितीही जवळ गेलं तरी परत तीच formality.
असं वाटायचं, तिच्यात पाणी कधी मुरायचंच नाही. सहवास.. सहवास ह्या असल्या पोरखेळातूनच जन्माला यायचा.
सगळी चित्रं डोळ्यांसमोरून फिरून गेली क्षणात..
पहिली भेट.. तुझं लाल जॅकेट. ते खोल घेऊन जाणारे डोळे. त्या डोळ्यातलं हसणं.
चहाच्या टपरीवरचं आपलं बोलणं. तुझी नेहमीची acidity. माझा नेहमीचा आग्रह.
तुझी कसली कसली पथ्य. आयुर्वेदिक सत्य. माझं घरी निघणं. तुझं मागून पळत येणं.
दोघांचीच लिफ्ट. संक्रांतीचं गिफ्ट. गाड्यांवरचं रात्रीचं बोलणं. चांदण्यात फुललेलं.
अपुरी राहिलेली कॉफी शॉप ची visit. अपुरी राहिलेली माझी treat.
हे सारं.. सारं विस्कटलं.. तू.. त्या चिकण्या पोरामुळं.. नव्हे मुलगी असलेल्या married पुरुषामुळं.
त्या मूर्खाचं लगट कारायला जाणं मी समजू शकतो. पण तुझे प्रतिसाद ह्या सगळ्या ठेव्यावरती पाणी सांडून गेलं.
अगदी भरल्या ताटात पाण्याचा ग्लास सांडावा तसं. आत्ताशी तर कुठं ही सुरुवात होती एका नव्या मैत्रीची. तू रंगच उडवलेस ह्या चित्रातले.
आता सगळं कसं रुक्षं वाटतंय ना. आता मी तो मी ही राहिलेला नाही.
आणि तो देखणा married ही वैतागलाय म्हणे कशाने. तोही तुझ्यापाशी येणं बंद झालाय आता.
आता राहिलंय फक्त तू आणि तुझ्या भोवतीचं वाळवंट. दुनियाभरची पाखरं झोळीत भरायला निघालेलीस तू. पण झोळी फाटकीच निघाली तुझी.
No Regrets.

- रोहित

मिलिंद कुंभारे


तू रंगच उडवलेस ह्या चित्रातले.........

रंग भरतील पुन्हा .........
नव्याने प्रयत्न कर पुन्हा पुन्हा.......

छान लेख लिहिलस......आवडला!!!!!

Maddy_487