कीर्तीची गाथा

Started by Ram Gidde, May 11, 2013, 04:13:30 PM

Previous topic - Next topic

Ram Gidde

आउ तुमची कीर्ती अलौकिक
शब्द तोकडे गाण्यास कवतिक

ठेवुनी जाण पारतंत्र्याची
पेटविली ज्योत स्वराज्याची
देवूनी धडे पराक्रमाचे
महत्व वाढविले मायभूमीचे

घडविले तुम्ही शिवबास जैसे
तैसेच घडविले बाळ शंभू
दिधले आम्हास ऐसे रतन
प्राण खर्चून ज्यांनी राखिले वतन

तव चरणी माते ठेवुनी माथा
गात राहीन तव कीर्तीची गाथा


केदार मेहेंदळे

pahilich kavita vachali "Aau"n var...chan ahe


मिलिंद कुंभारे