तुझ्याशिवाय

Started by Vikas Vilas Deo, May 12, 2013, 01:57:34 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

तुझ्याशिवाय जगणे
हे मरणासम भासते
चेहय्रावरती असून हासू
आसू नयनात दाटते

तुझ्याशिवाय जगणे
जणू ग्रीष्मातले वाळवंट
दोन क्षणाचे ना सुख
नेहमी ह्रदयात खंत

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे विषाचाच प्याला
सुखाचे क्षण ही वाटतात
दुःखाचे डोगर मला

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे पाण्याविणा जगतो जसा मासा
तुझ्याशिवाय सांग
जगू तरी मी कसा

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे अंत नसलेली वाट
चालतच रहायच
न पाहता विश्रांतीची वाट

तुझ्याशिवाय जीवनाला
जीवण कसे म्हणू
सहणच होत नाही कल्पनाही
मग तुझ्याशिवाय कसे जगू?

तुझ्याशिवाय जीवण
म्हणजे जीवण नव्हे
जीवण जगण्यासाठी
तुझ्याशिवाय मला काय हवे !

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे