ध्येय्यवेडा

Started by प्रशांत नागरगोजे, May 14, 2013, 11:20:27 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

काळाकुट्ट अंधार पुढे, थांबतो इथेच आता
आज होतो मी आंधळा, काळाकुट्ट अंधार पुढे

पुढे वाट गवसत नाही, वाटते हीच मंजिल माझी
होतो मुसाफिर आज मी, पुढे वाट गवसत नाही

असंख्य काटे वाटेवर या, धरतो दुसरी वाट चला
मी पेरितो बिया फुलांच्या, असंख्य काटे वाटेवर या

मी एकटाच आहे, कसा गाठेल मंजिल ही
आता कशाची परवा मला, मी एकटाच आहे

मनात जिद्द अफाट आहे, शरीरात मात्र त्राण नाही
आजच परीक्षा ताकदीची या, मनात जिद्द अफाट आहे

आज हरलोय मी, लढाई संपली आहे
सळसळते रक्त नसात अजून, फक्त, आज हरलोय मी

मी वेडा आहे, जग हसेल मला
जग कसे विसरेल मला, मी ध्येय्यवेडा आहे.
            -आशापुत्र
            
www.prashu-mypoems.blogspot.com