मराठी ग़जल - तिचा हुंदका

Started by satish-Aman, May 14, 2013, 12:51:54 PM

Previous topic - Next topic

satish-Aman

चंद्र हि  थोडा आज, नभात मंदावलेला होता ,
माझ्या ग़जलेचा श्वासहि, आज गहिवरलेला होता .

तारा तुटताना पाहुन, आज काही मागताना ,
शब्दात तिच्या हुशार,  हुंदका दाटलेला होता .

आनंद वाटला असाच, साथ होते थोडेच जिवलग ,
काहींचा अबोला अजुनी, शब्दांत अडकलेला होता .

डोळ्यात माझ्या होती, कोवळ्या स्वप्नाची राख  ,
हृदयात अजुनी एक, निखारा धगधगलेला होता.

भेटतो मी जखमा झाकुनी, उसने हास्य आणुनी ,
दूरच्या जुन्या गावात, अजुनी जीव गुंतलेला होता .

कधी वाटते मावळतीला, तिला जरूर एकदा..... भेटावे ,
पण आसमानीत अजुनी, थोडा काळरंग रंगलेला होता.

काळ हि सांगतो तुला,....... माझी काळजातील गुपिते ,
मनात त्याच्या अजुनी, थोडा माज बाकी राहिलेला होता.

अरे सोडुन दे रे  जीवना , व्यर्थ शोध गूढ उत्तराचा ,
पुढे गेलेल्यांनी आपला , प्रश्न कधीच बद्ललेला होता .

मिलिंद कुंभारे

चंद्र हि  थोडा आज, नभात मंदावलेला होता ,
माझ्या ग़जलेचा श्वासहि, आज गहिवरलेला होता .

तारा तुटताना पाहुन, आज काही मागताना ,
शब्दात तिच्या हुशार,  हुंदका दाटलेला होता . ....

very nice!! kya baat!! :) :( :) :(