वाडीच्या रमणा

Started by विक्रांत, May 15, 2013, 02:33:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तुझिया डोळ्यात l पहिली करुणा l
वाडीच्या रमणा l नृसिंह देवा ll १ ll
तुझिया कृपेची l एकच नजर l
भवाचा सागर l पार झाला ll l२ ll
कित्येक तरले l गतीस पावले l
भक्तीने जाहले l सुखी जन ll ३ ll
पतित जरी मी l येताच शरण l
प्रेमे स्वीकारून l तारीयले ll ४ ll

विक्रांत प्रभाकर