शब्दाचा हा पोरखेळ माझा

Started by avi10051996, May 16, 2013, 10:34:02 PM

Previous topic - Next topic

avi10051996

........शब्दाचा हा पोरखेळ माझा ...तिला नसावा अवगत सारा
म्हणून सोपे करून सांगतो आज गत सप्ताहातील कोंड्मारा

रोज पहाटे नित्य उठणे, आजतरी दिसेल या आशेवर क्षणभर थिजणे
एका नयनी आस,एका नयनी सदैव भास,नसतानाही सामोरी दिसणे
तो ओळखीचा रस्ता,ओळखीची वाट...पाऊलखुणा तपासत फिरणे
आज दिसेल व्हरांड्यात,आशा लेवुनी कानोड्या नयनी बघणे

मनातली झबि तरळून जाता...तू दिसल्याचा आभास होणे
वेड्या मनाला समजावून पुन्हा आल्या पावली परतून जाणे
उद्या नक्की दिसशील...आशेवर पापणीने नयनाची समजूत काढणे
परतेल कशी...कोणते वाहन...तर्क-वितर्काला उधाण येणे

मग जगी तुझ्या नेण्याऱ्या प्रत्येक वाहनावरी डोळे खीळने
प्रत्येक खिडकीतील सौन्दर्यात तुझाच चेहरा शोधणे
नसता करी कोणीही इशारा ....हात आपोआप हलता करणे
या नंतरच्या वाहनात असेल मनाची खोटी समजूत काढणे

लग्नकार्य माहित असूनही...प्रत्यक्ष सहभागी होणे टाळणे
परतीच्या मार्गावरती फक्त कळफलक बनुनी थांबणे
बरेच झाले .... नवीन रूप नयनी गोन्दायाचे वाचले
पूर्वीची ती मनोहर मूर्ती सुखावल्या मनी पुन्हा टाचले....

पुन्हा परतून स्व:जगी फटकार कुंचल्याचा रेघाटने
माझ्या वाळवंटी कागदावरी...रेषा आठवणीच्या गिरवणे

केदार मेहेंदळे

kavitech nav as ka dilay samajal nahi