आठवण त्या भेटीची…

Started by Maddy_487, May 20, 2013, 05:36:15 AM

Previous topic - Next topic

Maddy_487



आज शेवटचे एकदा भेटायला ये म्हणालीस मला
भेटायला पण नेमकी तीच जागा आवडली तुला
जिथे पहिल्यांदा प्रेमाने मिठी मारली होतीस मला

नेहमीप्रमाणेच आजही मी लवकर आणि तू उशिरा
नेहमी तुझ्या उशिरा येण्याचा राग करणारा मी
आज तू येयुच नयेस म्हणून प्रार्थना करणारा मी

शेवटी आलीस क्षणभर थांबलीस
बोलत सुटलीस आवेगाने
नेमके तेच जे ऐकायचे नव्हते

जसे शब्द तुझ्या तोंडून सुटत होते
मन माझे शब्दांबरोबर तुटत होते

तू बोलत होतीस मी नुसताच उभा होतो
तुझ्याबरोबर असतानाही एकटा पडत चाललो होतो

डोळ्यात अश्रू दाटू लागले शब्द ओठाआड गडप झाले होते
तू मात्र अखंड बोलत होतीस, मेलेल्या मला सरणावर जाळत होतीस

अचानक सारे काही थांबले, काळच थांबल्याचा भास झाला
जेव्हा माझ्या हातांना तुझ्या कोमल हातांचा स्पर्श झाला

त्याच हाताने तुला थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुधा झाला
हाताच्या ओंजळीत तेव्हा तुझ्या डोळ्यातले मोती पडले
इतके वर्ष जे मी कधीच नाही सांडू दिले

आणि निघालीही ती गरकन वळून
शेवटची ती भेट माझ्या ओंजळीत ठेऊन
मी तसाच उभा होतो शेवटपर्यंत
त्या पुसट होणाऱ्या आकृतीकडे आशेने बघत
आपल्याच नशिबावर हसत
शेवटची ती भेट सावरत...


                          मंदार



sweetsunita66


आणि निघालीही ती गरकन वळून
शेवटची ती भेट माझ्या ओंजळीत ठेऊन
मी तसाच उभा होतो शेवटपर्यंत
त्या पुसट होणाऱ्या आकृतीकडे आशेने बघत
आपल्याच नशिबावर हसत वा ,
शेवटची ती भेट सावरत..................................वा ,खरच खूपच छान

Maddy_487


धन्यवाद सुनिताजी