आता कुठे हसू लागलो आहे मी ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 21, 2013, 10:55:40 AM

Previous topic - Next topic
आता  कुठे हसू लागलो आहे मी
तुला  विसरलो  आहे  असे  सांगतो
खरे तर आठवणी सोबतच जगू लागलो आहे मी ..

आता तुला  माझा  कसलाच त्रास  होणार नाही
कारण  ते शहरच तुझे  सोडून आलो आहे मी
सारी नाते  सारे  सोबती  सोडून
आज  एकटे जगू लागलो आहे मी ....

एक खरे सांगू तुझ्याच आठवणी  आहेत
म्हणूनच  जगू लागलो आहे मी ....

आठवतात  ते  दिवस मला आज ही
जेव्हा  तू  माझ्या जवळ असायची
कधी  रे आपण  लग्न करू

सारखे मला बोलत असायची
पण  माझे  दारिद्र्य

माझ्या  प्रेमात ही  आडवे  का यावे
जे  तुला  आज  दुसर्याचे पाहत  यातना भोगतो आहे मी ....

तुला मात्र  माझे  दुख नाही  मी दाखवणार
कारण  मला ठाऊक आहे
कळेल तुला  हे  तेव्हा 
डोळ्यांतले तुझ्या पाणी बनणार आहे मी .....

हरलो आहे मी  आयुष्याच्या  ह्या  युद्धात
पाकळ्यांसारखे गळून  पडलो आहे मी
तुडवत आहे  भावनांना  माझ्या आज सारेच
तरी  अश्रू  लपवून  जगतो आहे मी ....

तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
-

© प्रशांत शिंदे

मिलिंद कुंभारे

आता खरेच  हसतो आहे मी .... :'( :'( :'(

be happy always...... :) :) :)


आता खरेच  हसतो आहे मी .... :'( :'( :'(

be happy always...... :) :) :)
:) thank u  milind ji 


sweetsunita66

तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
- छान !!!भावनांना वाट मोकळी करून दिलीय ... हसत राहा ,जग आपल्या मुठीत येईल ।  :) :) :) :) :)


तुझा फोटो  छातीशी  ठेवून
तुझ्या आठवणींत जगतो आहे मी
आता खरेच  हसतो आहे मी ....
- छान !!!भावनांना वाट मोकळी करून दिलीय ... हसत राहा ,जग आपल्या मुठीत येईल ।  :) :) :) :) :)
chan   sunita ji :)