प्रेम करन हि खरच एवढी मोठी चूक आहे का?

Started by Shona1109, May 21, 2013, 02:28:04 PM

Previous topic - Next topic

Shona1109

एकटी होती तेव्हा आनंदी होती
स्वतःच्या छोटुल्या जगात समाधानी होती
साध सरळ जीवन मस्त होत

तू आलास जीवनाला जगण्याचा नवा  सूर गवसला
न आवडणाऱ्या गोष्टीही आवडू लागल्या
आयुष्य स्वर्गाहूनही सुंदर वाटू लागलं
तुझ्यापर्यंत येउन जग माझ संपत होत

तू गेल्यावर मात्र दिशा सगळ्याच हरवल्या
स्वप्नांचा सगळ्या चुराळा झाला
जगण्याची इच्छाच संपल्या
उरली आहे ती फक्त जगण्याची सवय

त्यापेक्षा.......
        कोणीच कधीच न यावं
        अन आल्यावर कधीच न जावं
        तू येऊन स्वप्न दाखवून ती हिरावून तरी न घ्यावं
        निदान कोणीतरी कधीतरी येईल ह्या आशेवर आयुष्य तरी संपाव

त्रास होतो ह्या सगळ्याच गोष्टींचा
हे ऐकायला पण कोणीच कस नसावं
याहून कमनशिबी कोणीच कधी नसावं


दूर सारून आयुष्यभर एकट राहायची शिक्षा का तू द्यावं
जे कधी स्वतः जगलेले क्षण मलाही जगायला का शिकवावं

प्रेम करन हि खरच एवढी मोठी चूक आहे का?
कि त्याची शिक्षा श्वास कायमचाच बंद झाल्यावरच संपणार आहे का?....Shona









वैशाली

"तू गेल्यावर मात्र दिशा सगळ्याच हरवल्या "


----------------------------------

शोना, तो "मदन" तुझ्या आयुष्यातून
पसार झाल्याबद्दल देवाचे आभार तू मान.
"दिशा सगळ्या हरवल्या"
असला सगळा विचार केवळ
तारुण्यातला स्वप्नाळूपणा आहे.

Maddy_487