** वाईट दुनिया **

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), May 21, 2013, 04:03:03 PM

Previous topic - Next topic
** वाईट  दुनिया **

दुनिया खूप वाईट आहे,
हे कळून चुकलय मला....
एकच विणवनी आहे माझी देवा,
तु घेवुन चल इथुन मला... 

जगु कसा इथे मी,
हि दुनिया आहे खोटी...
लोभापायी इथे,
तुटतात बघ नाती गोती...

उभं राहायला शिकवल ज्यांनी,
त्यांना बघ पोरगा विसरतोय...
घरात जागा नाही म्हणून त्यांची,
वृद्धाश्रमात रवानगी करतोय...

फूलणारी कळी इथे,
फूलण्या आधिच खुडली जातेय...
नराधमांची वासना इथे,
भरभरुन बघ वाहतेय...

श्रीमंताच्या तिजोरीत,
रातोरात पैसा वाढतोय...
गरीब माणूस इथे,
उपासमारीने बघ मरतोय...

डोक्यावरच्या कर्जाला  कंटाळून,
शेतकरी आत्महत्त्या करतोय...
भ्रष्टाचारी माणूस घोटाळे करून,
नवा इतिहास बघ घडवतोय...

अजुन काय सांगू तुला,
काय काय इथे घडतय... सुशिक्षीत माणूस म्हणतो,
जे घडतय ते घडतय...
पण आम्हाला त्याच काय पडतय ???

© कौस्तुभ

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

फारच छान कविता ............  :)


सर्वांचे मनापासुन आभार