पराभव

Started by sharktooth19, May 21, 2013, 08:34:42 PM

Previous topic - Next topic

sharktooth19



Result lagala :(

क्षणच तो गुन्हेगार होता;
उजाडून टाकले..
मनात होते गाव एक वसलेले.



आम्ही फक्त बावळट वेडे;
बाकी सगळेच इथे कसलेले.


आत्महत्या करणारे किती सुखी;
नाहीतर आम्ही..
जगण्याच्या दलदलीत फसलेले.


लोक म्हणतील उठा, परत हसा, परत कामाला लागा;
कदाचीत तुला दिसेल..
मनात आहे शल्य एक ठसठसलेले


पाणी नव्हते फार, नुसता चिखल गाळ
आणि एक गलबत फसलेले..


कविता नव्हे ही फक्त एक रचना आहे
दु:खांवर दु:ख एकावर एक रचलेली..

Rohit Dhage

One of the gud poem i read in recent times..

मिलिंद कुंभारे

कविता नव्हे ही फक्त एक रचना आहे
दु:खांवर दु:ख एकावर एक रचलेली..

nice....... :)

sharktooth19