एक थेंबुटा...

Started by shashaank, May 22, 2013, 10:11:01 AM

Previous topic - Next topic

shashaank

एक थेंबुटा...

एक थेंबुटा उनाड
आभाळात हरवला
पहाटेला पानांवर
दंवरुप झळकला

एक थेंबुटा निवांत
झर्‍याकाठी पहुडला
चोच रान-पाखराची
वेडा करीतसे ओला

एक थेंबुटा गगनी
ढगामधेच दडला
दंगा करुनिया फार
धरेवर विसावला

एक थेंबुटा बिचारा
पापण्यात उमटला
हाक घालूनी मेघांना
उगामुगाच आटला

एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्‍याला जिणं 



-shashaank purandare.

केदार मेहेंदळे

Punha Swagat Shashank...chan kavita..

मिलिंद कुंभारे

एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्‍या जीवन

फारच छान ......  :)

Rohit Dhage


shashaank

रोहित,
कसला मस्त आणि नेमका बदल सुचवलास मित्रा - खूपच आवडला, बदल करीत आहे.