स्पंदनांच्या तरंगा …

Started by sweetsunita66, May 22, 2013, 01:07:31 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

तुझ्या नि माझ्या मधात ही रेघ कुणी ओढली .,
अशी पक्की रेशीम बंध गाठ कुणी सोडली ।

जन्म भराच्या साथीच्या आणा -भाका कुठे विरल्यात ,,
येवढ्या लवकर दोघांमधला प्रेमाचा ओलावा का सरला .

माहित आहे दुनियादारीच्या जाळ्यात आपण अडकलो ,,
पण प्रेमासाठी पैसा ,,वेळ ज़रुरी नसते हे का  आपण विसरलो ।

दूर राहून आठवणीतच दिवस काढले हे का आपल्याला माहित नाही ,,
मग आत्ताच का वेळ नसल्याचा बाऊ काही -बाही ।

दूर राहून असली प्रेमाची परीक्षा होते हेच शास्त्र सांगते .,
स्पंदनांच्या तरंगांना ओळखणे हेच रास्त असते ।

प्रेम काय फक्त राधेचंच असत मीराच्या प्रेमाला काय प्रतच नाही ?
विरह हा अविनाशी प्रेमाची गुंतवणूक असते त्याला काय मोलच नाही ।

म्हणूनच माझ्या स्पन्दनाना तुझ्या स्पंदनाची साथ हवी आहे .
फक्त हेच तुला सांगायचं आहे ,,हेच तुला सांगायचं आहे .........।
                                                                                    सुनिता नाड्गे [शेरकर ]

मिलिंद कुंभारे


sweetsunita!!!

पुन्हा एक कविता ......

माझ्या स्पन्दनाना तुझ्या स्पंदनाची साथ हवी आहे ........

सुधीरसाठी वाटतं ......
फारच छान आहे.......
:) :) :)

sweetsunita66

नाही रे ,असंच !!तसं छान वाटलं वाचून  ;) ;) ;)

केदार मेहेंदळे


sweetsunita66



sweetsunita66

धन्यवाद !!!असाच लोभ असावा .........  :) :) :)