कसे नि कुठून ???

Started by shashaank, May 25, 2013, 02:53:01 PM

Previous topic - Next topic

shashaank

कसे नि कुठून ???

उंच उंच आकाशात ढग येतात कुठून ?
ढगात या एवढाल्या पाणी भरतात कुठून ?

पाणीवाले ढेरपोटे ढग कसे पळतात ?
ढकलाढकली करताना दंगा किती करतात ?

वीज कशी चमकते काळ्या ढगातून ?
पाणी कसे पडते बदाबदा त्यातून ?

ढग तर काळा काळा दिसतो किती दुरुन ?
पांढर्‍या शुभ्र गारा पडतात कशा त्यातून ??

किती प्रश्न विचारशील कसे नि कुठून...
खा जरा गारा नि ये मस्त भिजून ....

-shashaank purandare.

rudra

chaan kavita...
pavsachi chahul lagli aahe....

नीलम

गारा खाऊन, मस्त भिजून
घरी आल्यानंतर मात्र
सर्दी होऊन, शिंकून शिंकून
गादीवर पडू नकोस
आणि मला विचारू नकोस
शंका तुझी - "आई, इतक्या
शिंका मला
येतात कश्या आणि कुठून?"

केदार मेहेंदळे



sweetsunita66


vijaya kelkar


shashaank