** प्रेम **

Started by SANJAY M NIKUMBH, May 25, 2013, 11:22:37 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

** प्रेम **
------------------------
माझ्या हृदयाचे
तुकडे तुकडे करून
तू भिरकावून दिलेस
जगाच्या काना कोपऱ्यात
जेथे ही जातो
तो तुकडा दिसतो
अन मी बघतो
तुझाच चेहरा त्यात
मी लपवून ठेवली होती
प्रिती माझ्या हृदयात
तूच पसरवलास तो गंध
दाही  दिशात 
त्या तुकड्यातून निनादतो
तुझ्याच नावाचा स्वर
जो तो म्हणतोय प्रेम कराल तर
या हृद्यासारखंच कर .

                              संजय एम निकुंभ , वसई
                   

प्रशांत नागरगोजे

आवडली ....मस्त आहे कविता

SANJAY M NIKUMBH