अंतरीच्या वेदना

Started by joshi.vighnesh, May 26, 2013, 03:59:09 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

अंतरीच्या वेदनांना अंतरात साठविले
वाहनार्‍या आसवांनी नाव तुझेच घेतले

एकटा राहतो आता मी चार माणसातही
त्या चार माणसांनी मला रडतांना पाहीले

मार्ग होता मोकळा एकटा मी चाळत गेलो
एकट्या मार्गात मला काटेच होते बोचले

अलवावर दवबिंदू मोत्यासम वाटतो
शिपल्याच्या आत मोती साठवल्यासम झाले

माझीच होतीस तू ना आता माझी राहीलेले
तूझ्यातल्या मला तू परक करून टाकले

प्रेमाचे प्रेमांकूर तू लावुनी विसरलीस
विसरल्या झाडास मी या वादळात जपले

विघ्नेश जोशी...

Ankush S. Navghare, Palghar


प्रशांत नागरगोजे

आवडली कविता....
प्रेमाचे प्रेमांकूर तू लावुनी विसरलीस
विसरल्या झाडास मी या वादळात जपले