पावसाआधी

Started by shashaank, May 27, 2013, 10:03:13 AM

Previous topic - Next topic

shashaank

पावसाआधी

काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा
कपाळभर भरलेल्या काळजीच्या रेघा

विहीरींचे पाणी केंव्हाच सरले
रिकामे हंडे गावभर फिरले

दूरवर आभाळात काळसर ढग
निचरून काढतात निराशेचे मळभ

निबर चैत्रपालवी वार्‍यावर झुळकती
मनामनात पावसाची आशा तरळती


-shashaank purandare.

केदार मेहेंदळे


विक्रांत

 :) निबर चैत्रपालवी  ha shabd prayog thoda explain karashil ka ?

rudra

विहीरींचे पाणी केंव्हाच सरले
रिकामे हंडे गावभर फिरले
surekh mitra.....

shashaank

सर्वांचे मनापासून आभार.

विक्रांत - "निबर चैत्रपालवी" - नवी पालवी चैत्रात येते. आणि पाऊस साधारणतः ज्येष्ठाच्या मध्यात किंवा शेवटी शेवटी येतो. तोपर्यंत ही पालवी जुनी/ निबर झालेली असते.
निबर हा शब्द आपल्या मनातील आशेलाही लागू होतो. असंख्य लोक पावसाकडे डोळे लाउन बसलेले असतात. सुरुवातीला जरी पाऊस आला नाही तरी उद्या येईलच हीच "निबर आशा" - "चिवट आशा".
धन्यवाद. 

मिलिंद कुंभारे

अप्रतिम कविता........
:) :) :)


shashaank