'शब्द'

Started by aap, May 29, 2013, 01:40:42 PM

Previous topic - Next topic

aap

'शब्द'

'शब्द' दोन अक्षरी शब्द किती परवलीचा असतो नाही . पूर्वी जेव्हा आवाजच तंत्र उपलब्ध न्हवते तेव्हा असे वाटायचे

शब्दावाचून सारे कळले शब्द्नाच्या पलीकडले

'शब्द' शब्दात किती जादू आहे नाही . लहानपणी आपण पहिल्यांदा बोलायला लागतो तो सुरवातीचा दोन अक्षरी शब्द

'आई'किती अप्रूप वाटतना ,आपल्याला या शब्दाच हळू हळू आपल्या शब्दकोशात भर पडायला लागते . आणि मग आपल्याकडे शब्दांच

भांडारच साठते .

शब्दाला अर्थ असतो , शब्दाला मोल असते, शब्दाला गोडवा असतो ,शब्दाला ओलावा असतो ,शब्दाला माया असते ,शब्दाला किमत असते, शब्दाला वजन असते, शब्दाला कविता असते, शब्दाला टीका असते, शब्द कटू असतात, शब्द जहरी असतात, शब्दाला काटे असतात, शब्द तिखट असतात, शब्द शस्त्रे असतात, तर सांगायचे तात्पर्य असे कि, शब्दाचाउपयोग जो तो आपल्या मती प्रमाणे करीत असतो क़हि माणसांच्या जिभेवर निवडुंगाची

फडी असते तर काही लोकांच्या जिभेवर फुलांची परडी असते. काही माणसे जळणारी ,पोळणारीअग्निशिखा असतात तर काही माणसे

संजीवनी देणारे अमृत वल्ली असतात .पदार्थाचा  तिखटपणा डोळ्यात क्षणिक ,पाणी आणणारा ,तर शब्दाचा तीखटपणा डोळ्यात कायम पाणी वहाणारा असतो रक्ताळलेल्या जखमेवर ऒषध घेऊन मलम लाऊन ती सहज भरून येते पण शब्दांची जखम हृदयावर

झालेली असते त्याच्यावर कुठलेही सोपस्कार करता येत नाहीत  जखमेवरचा  पापुद्रा दूर केला कि त्यातून फक्त वेदनाच होतात फ़्क्त वेदनाच .तेव्हा  लोक हो कळली ना तुम्हाला या जगातली किमया तेव्हा शब्दांचा वापर जरा

जपूनच आपण  आपल्या जवळ फुलांची प्र्दीच बाळगूया म्हणजे आयुष्याच्या पुढील वाटेवर फुलेच फुले असतील ,नाही का ?                             

      सौ . अनिता फणसळकर