त्याचं वागणं

Started by केदार मेहेंदळे, May 29, 2013, 01:54:26 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आज सकाळी अचानकपणे
तो आला अन बरसून गेला
ओल्या खुणा ठेऊन मागे
प्यास तिची वाढवून गेला

रोज आता तो असंच करेल
बघणार नाही काळ वेळ
वाट त्याची बघायला लावेल
अतृप्ती तिची अशीच वाढवेल

त्याच्या अशा वागण्यानी
अतृप्त ठेवेल तो रोज तिला
मुसळधार कोसळून मग एक दिवस 
.......पाउस तृप करेल.......धरणीला

(आज सकाळी आमच्या पनवेल मध्ये अचानक पाचच मिनिटंरिमझिम झाली आणि वातावरण एकदम आल्हादायक झालं. त्या क्षणी सुचलेल्या ओळी आहेत ह्या......)



केदार...