जखम

Started by प्रशांत नागरगोजे, May 29, 2013, 10:02:38 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

जरासा सावरतोय आत्ताशी
भरताहेत जखमा हळुवार
हळुवार...खूप हळुवार
त्यात येते कधी तुझी आठवण
सावरलेली जखम चिघळवायला...
सहन होत नाही.....
पण आता सवय झाली आहे
मीही चोळत असतो आता मीठ जखमांवर
स्वतःलाच दोष देत....
कोणाला चिंता नाहीये माझी, तुलापण...
मलाही नाहीये फिकीर कोणाची, फक्त तुझी..
असतो बसलेला वाट पाहत तुझी
सावरलेली जखम चिघळत
.तू येशील या आशेनं
तुटलेलं हृदय जोडत .....
                       -आशापुत्र

१. इश्क
http://www.prashu-mypoems.blogspot.in/2013/05/blog-post_1782.html
२. ये तेरी तो मोहब्बत है
http://www.prashu-mypoems.blogspot.in/2013/05/blog-post_6257.html

मिलिंद कुंभारे


प्रशांत नागरगोजे

dhanyavad milind...