एक विचार

Started by देवेंद्र, May 29, 2013, 10:42:42 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

कितीही झालं तरी
सूर्य मावळायचा थांबत नाही
आणि नकोश्या रात्रीला
उगवती पुढे झुकावच लागतं

ग्रीष्मानंतर येणारा पाउस
आनंदच देतो
अन शिशिराला उत्तर असतं
सुंदर वसंताचं

दुःख नाकारता येत नाही
मग आनंद का नाकारायचा
भरभरून नाही कदाचित
पण ओंजळ का छोटी  करायची

'ठेविले अनंते' असं राहायला
संतपण  लागतं
पण चित्ताच समाधान
कणा कणातून जमवता येतं

- देवेंद्र

shashaank

पण चित्ताच समाधान
कणा कणातून जमवता येतं  >>>>> अतिशय सुंदर विचार.

Shona1109

Vichar kharach khup surekh aahet....


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

 
'ठेविले अनंते' असं राहायला
संतपण  लागतं
पण चित्ताच समाधान
कणा कणातून जमवता येतं!!!!!!!!!!!!!!!!मस्त आहे

कवि - विजय सुर्यवंशी.

छान विचार आहे.....

vijaya kelkar

   एक विचार ----विचार करावयास लावणारा ----

Swateja


dipak chandane