पक्ष्यांची जत्रा

Started by eknatha@rediffmail.com, June 01, 2013, 09:48:48 PM

Previous topic - Next topic

eknatha@rediffmail.com

"पक्ष्यांची जत्रा"

पाण्यावर बसला ध्यानाला
रोहीतांचा थवा
लाल चुटूक चोचीने चाखे
माशांचा मावा

करकोचा भिरभिरे शिरावरी
कवेत घेण्या आकाश
घेवून झेप सर सरे
लांब लांब अथांग क्षितीवरी

सोनसळी बदक ही तरंगे
हलके हलके,  संथ डोहा वर
उठती नाजूक लाटा
जशी अंगावर शीरं शीरं

श्वेत शराटी ऐटीत हिंडे
पचक पचक काठा वर
माने संगे डुले वाऱ्यावर
तयाची मुलायम शेंड

रमाकांत
एकनाथा@रेडिफमेल.कॉम

"नाशिक च्या पक्षी रुपी पाहुण्यांना समर्पित"

केदार मेहेंदळे


rudra



मिलिंद कुंभारे


vijaya kelkar

छान,रोहित ह्या शब्दाचा अर्थ सांगाल?