असा ही वसंत

Started by vijaya kelkar, June 02, 2013, 01:38:43 PM

Previous topic - Next topic

vijaya kelkar

    असा ही वसंत
नमून पळसाच्या कळसा
घालून पिंपळाला वळसा    ---
पळता पळात सरली वाट
आला झुळ-झुळ नदीचा काठ    ---
वटाच्या जटा खेळ सूर-पारंब्यांचा
वास तेथे गोड रसाळ आंब्यांचा   ---
अशोकाने हात टेकले आभाळा
गवताने हात मारले कपाळा    ---
घातल्या अमलताशाने पिवळ्या माळा
लागला गुलमोहोराचा लळा   ---
डांगर मळ्याची हिरवळ , लपली हरळ
वांगड डोईची शिरवाळ , गेली मरळ
टिटवीचा गजर -- कोकिळेची हाक
वसंताची नजर -- सरला शिशिराचा धाक
       ----------------