पाउस कविता (भाग - १)

Started by केदार मेहेंदळे, June 04, 2013, 02:34:36 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

हल्ली मला एक समजलं आहे.
कितीही वाट बघितली तरी
पाउस कोसळतो त्याला हवं तेंव्हाच.
आपल्याला मात्र उगाच त्रास होत रहातो
वाट बघूनही तो कोसळत नाही म्हणून.

हो....उगाचच!

कारण कधीही कोसळला तरी
तो तितकाच सुखावून जातो आपल्याला.
म्हणून अपेक्षा ठेवायची नाही
त्याच्या बरसण्याची.

तुझ्याही बाबतीत
मी हेच धोरण ठेवलंय आताशा.


केदार...

shashaank

तुझ्याही बाबतीत
मी हेच धोरण ठेवलंय आताशा. >>>>>> THATS GREAT

vijaya kelkar

     तुझ्याही बाबतीत   
     मी हेच धोरण ठेवलय आताशा ................
   हे अगदी छान.........

kumudini

#3
                                kawita khup awadly. chan aahe

Swateja


sweetsunita66

कारण कधीही कोसळला तरी
तो तितकाच सुखावून जातो आपल्याला.
म्हणून अपेक्षा ठेवायची नाही
त्याच्या बरसण्याची......... :) :) :)अतिशय सुंदर रचना !!