कार्तिक

Started by kumudini, June 04, 2013, 06:36:00 PM

Previous topic - Next topic

kumudini

 
थंडी कार्तिकास बहर ये फुलास
आसमंत दरवळला
पहाट वेळी ताटव्या तळी
कळ्या प्रसवल्या फुला
त्या गंधाने गगनी रविराज जागला
पव नाच्या हिंदोळ्यावर
झुलत उगवला
द्व बिंदूचे आच्छादन
तृणावरुन लोपले
मखमाली हिरवळीने स्वरूप बदलले
टाळ्यांच्या गजरात कुणी
गाई काकडारती
मंदिरातला मधुर नाद
मनी घुमत राहिला
कुमुदिनी काळी कर