वार्धक्याची नांदी

Started by aap, June 06, 2013, 03:19:24 PM

Previous topic - Next topic

aap

वार्धक्याची नांदी

बुद्धी नाठी आली साठी

लागली हो वार्धक्याची नांदी

डोक्यावरती तुरळक तुरळक

जमू लागली चांदी

      लागली हो वार्धक्याची नांदी

चर्वण करिता निखळू लागल्या

दातांच्या पंगती

    लागली हो वार्धक्याची नांदी

तोल सावरता हाती आली

आधाराची काठी

      लागली हो वार्धक्याची नांदी

डोळे रुसती कान हि फुटती

सरू लागली कांती

   लागली हो वार्धक्याची नांदी

तारुण्याचा जोश ओसरुनी

शिथिल गात्र ओहटी

     लागली हो वार्धक्याची नांदी

                                  सौ . अनिता फणसळकर   

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे

hmnhmnhmn!  aamhi sudhdha lavkarach ase honar...

sweetsunita66

 :)कविता फारच छान आहे मस्त लिहिलं