सौदामिनी

Started by kumudini, June 08, 2013, 04:41:06 PM

Previous topic - Next topic

kumudini

                           सौदामिनी
मध्यप्रदेशी असे एक गाव
झाशी आहे त्याच हो नाव
तेथे शौर्याची होती खणी
लक्ष्मीबाई झाशीची राणी, झाशीची राणी
करू खालसा संस्थानाला
बोलला गोरा राणीला
ऐकुनी कपट नितीला
ज्वाला ती पेटुनी उठली, झाशीची राणी
ऐलान युद्धाचा केला
सज्ज केले साऱ्या सैन्याला
घेतली उडी रणी
होऊनी रणचंडी, झाशीची राणी
बांधून बाळ पाठीला
ठोकली मांड घोडयाला
घेऊनी नग्न तलवारीला
सोडी किल्ल्याला, झाशीची राणी
रक्तबंबाळ तनु जाहली
तरी शत्रु पुढती ना झुकली
तोडूनी शत्रूचे कडे निघाली पलीकडे
काल्पीच्या आश्रमाकडे, झाशीची राणी
बोलली तेथे साधूला
करा तुम्ही माझ्या अन्तेष्टीला
सांभाळा माझ्या बाळाला
बोलूनी येवढे सोडी श्वासाला, झाशीची राणी
अमल होता तेव्हा गोऱ्याचा
तो खेळला डाव कपटाचा
त्याची बळी जाहली
तेजस्विनी ज्योत तेजाची,झाशीची राणी
ही गाथा शौर्याची
ही कथा अमरत्वाची
ही ज्वाला चिरकालाची
जाहली अमर ती जगी, झाशीची राणी
                                    कुमुदिनी काळीकर

sweetsunita66

 :) :) :) :) :)कविता फारच छान आहे मस्त लिहिलंय थोडा शब्दात बदल केला की पोवाड्या सारखा वाचता येतं