"मनातला पाऊस" स्वरचित कविता

Started by sameer.kadam.718, June 09, 2013, 12:14:42 AM

Previous topic - Next topic

sameer.kadam.718

मनातला पाऊस

अंगी लाही लाही होता,मला पाऊसाची आस,
येता आभाळ दाटुन, होई धरणीही कासावीस.

दाट आभाळ पाहुन,होई माझे मन अधीर,
येता पाऊस पहिला, होई आसमंत मधुर.

धुंद पाऊस येता,येई मनाला उधाण,
शिड भरता मनाचे, येई शब्दांनाही स्फुरण.

थेंबाथेंबातुन येता झंकार, डोलु लागे माझे मन,
डोलु लागे वनराई, मन गेले गुंजनात हरखून.

गेला शिणवा थकवा, गाऊ लागले सारे हे रान,
ध्यानीमनी वसे, निसर्गाचे हे गान.

धुंद पाऊसाने माझे, मन झाले रे घायाळ,
येता उफाळून मन, होई कविता शब्दबंबाळ.

-समीर कदम (८ जुन २०१३)



केदार मेहेंदळे


rudra


sweetsunita66