पाउस कविता (भाग - २)

Started by केदार मेहेंदळे, June 10, 2013, 01:07:50 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


हा वेडा पाउस बघितलास?
रागावून पृथ्वीवर
निघून जातो दूर तिच्या पासून
................................वाफ बनून.
अन मग फिरत रहातो तिच्याच भवति
.................................ढग बनून
वाट बघत..........बोलावेल ती म्हणून.

पृथ्वीला तरी कुठं रहावतं त्याच्या शिवाय!
अन मग
पृथ्वीनं एक प्रेमाची फुंकर मारायचा अवकाश
कि बरसायला लागतो तो
सगळा राग विसरून
अन मग
भिजवून टाकतो पृथ्वीला सहस्त धारांनी.

मग पृथ्वी सुध्धा निश्वास सोडते
अन तृप होते भिजून गच्च
त्या बरसणार्या धारांनी.

हं....................
पृथ्वी अन पाउस....

आगदी तुझ्या अन माझ्या सारखेच
नाही का?


केदार...

rudra


vijaya kelkar


sweetsunita66

पृथ्वीला तरी कुठं रहावतं त्याच्या शिवाय!
अन मग
पृथ्वीनं एक प्रेमाची फुंकर मारायचा अवकाश
कि बरसायला लागतो तो
सगळा राग विसरून
अन मग
भिजवून टाकतो पृथ्वीला सहस्त धारां :) :) :)फारच  छान कविता !!

मिलिंद कुंभारे


पृथ्वी अन पाउस....

आगदी तुझ्या अन माझ्या सारखेच
नाही का?

सुंदर कविता आहे .... :)

shashaank