पावसाची सर येता

Started by SANJAY M NIKUMBH, June 11, 2013, 02:11:41 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पावसाची सर येता
---------------------------
काही कळे नां सखे
मज असे काय होते
पावसाची सर येता
तुझी आठवण येते

पावसाची सर येता
मन सैर भैर होते
मन वारा होऊन
तुझ्या कडे धावते

मन वारा होऊन
सुसाट गं पळते
कधी भेटशील तू
मनी आस जागते

कधी भेटशील तू
मन आतुर होते
हे वेडे माझे मन
किती गं जळते

हे वेडे माझे मन
तुज पाहता शांत होते
तू दिसता डोळ्यास
मनी चांदणे फुलते

तू दिसता डोळ्यास
उर आनंदाने भरते
पावसाची सर येता
हे असेच घडते  .

                                संजय एम निकुंभ , वसई
                               दि. ११ . ६ . १३  वेळ : १ .४५ दु.     



rudra