विरंगुळा

Started by aap, June 11, 2013, 03:13:35 PM

Previous topic - Next topic

aap

विरंगुळा

जेष्टांचा जेष्ठपणा जेष्ठ असावा

जेष्टांचा केंद्रबिंदू विरंगुळा असावा

    अनुभवाचे जेष्ठपण

     विचाराचे जेष्ठपण

      मनाचे मोकळेपण

त्यासाठी विरंगुळ्याचे अंगण

समदु;खी,समविचारी ,समवयस्क यांचा मेळा

लागतो त्यांना एकमेकांचा जिव्हाळा

     अंतरीच्या नाना कळा

      उलगडती वेळोवेळा

एकजुटीचा आत्मानंद घेउनी

सर्व समारोह पाडती पार

विविध कलांचा होतसे साक्षात्कार

थकली शरीरे परी मने तरूण

अंगी उत्साचे वारे

तरुणास लाजवती जेष्ठ सारे

ऎशा जेष्टांची जेष्टता वर्णू जाता

शब्द सानुला पडावा

शब्द सानुला पडावा

                              सौ . अनिता फणसळकर