अशीही आई असते

Started by SANJAY M NIKUMBH, June 12, 2013, 06:52:27 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

अशीही आई असते
=================
कुठलीही आई पोटच्या गोळ्याला
जीवापाड जपत असते
पण त्यालाही आयुष्यातून हद्दपार करते
अशीही आई असते
जन्म झाल्यावर जेव्हा कळते
हा मुलगा /मुलगी नाही
शरीर पुरुषाचे अन मन स्रीचे
तिलाही मानवत नाही
जेव्हा कळते तिला हे सत्य
ती कोलमडून पडते
आई असूनही घट्ट मन करून
त्याला घरातून हाकलून लावते
या नवख्या जगात मग
तो सैर भैर होतो
नाईलाजाने स्रीचे वस्त्र नेसून
तो स्री रूप घेतो
अतिशय खडतर जीवनाचा
प्रवास मग सुरु होतो
सापडून कुणाच्याही तावडीत
वासनेचा शिकार होतो
पोटाची खळगी भरण्यासाठी
त्याची वणवण सुरु होते
पडेल ते काम न मिळाल्याने
भिक मागण्याची पाळी येते
नका म्हणू हो त्यांना हिजडा
त्यांना शिवी ती वाटते
माणूस म्हणा आम्हा कुणी
हीच त्यांची आर्त हाक असते
त्यांनाही हवे शिक्षण
अन जगण्याचा मानाने अधिकार
पण करेल कां हा समाज
त्यांचा माणूस म्हणून स्वीकार
जर त्यांनाही समाज अन सरकारने
दिला हात माणुसकीचा
तर काय गरज असेल हो त्यांना
भिक मागून जगण्याचा
ते हि आज धडपडत आहेत
या प्रवाहात येण्यासाठी
त्यांना बळ अन दृष्टी हवी
माणसाने माणूस म्हणून बघण्याची
मग अशी आई कुणाच्या वाट्यास
कधीच येणार नाही
आईच्या महिमेचा अपवाद
या समाजात राहणार नाही .

                                   कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                   दि . १२ . ६ . १३  वेळ : ६ . १५ स .


   

vijaya kelkar

    कविता छान,म्हणजे विचार करायला लावणारी.
  अशी आई  !! कां??

मिलिंद कुंभारे