म्हातारीची व्यथा

Started by मिलिंद कुंभारे, June 12, 2013, 02:50:06 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

म्हातारीची व्यथा

गावच्या एका
पडक्या घरात,
रहायची,
एक म्हातारी,
एकाकी एकटी,
थोडीशी थकलेली,
थोडीशी खचलेली,
शांत अन सदैव,
हसरी!
तिने झेलली होती,
कित्येक पावसाळी,
अन सोसली,
कित्येक उन्हाळी,
तरीही स्थितप्रज्ञ ती,
नाही कधी स्थिरावली,
धुणी भांडी अन केरसुणी,
हिच तिची दैनंदिनी,
तरीही आयुष्याशी,
ती सदैव झुंजली,
सखा नव्हता सोबती,
जरी अनपढ अनाडी,
तिने पोराबारासनी,
योग्य ती यशाची,
दिशा दाखवली!
फाटकीच चोळी,
अन फाटकीच लुगडी,
तरीही समाधानी,
अशी ती जगावेगळी,
तिने कधी न रचली,
स्वप्ने मोठी मोठी!

नातवंडासनी,
अंगाखांद्यावर खेळवावे,
सुने मुलांच्या सहवासांत,
आयुष्य घालवावे,
उरले सुरले,
त्यांचाच सुखांत,
सुख आपले समजावे,
हेच तिचे स्वप्न खरे,
स्वप्न म्हणावे,
कि अंतरंग तिचे!
नको होते तिला,
आभाळ सारे,
अन चंद्र तारे,
नको होते ते,
उंच उंच इमारतीमधले ,
अलिशान बंगले,
सातही समुद्र,
तिच्या डोळ्यांत,
होते डबडबले,
फुटता बांध,
पूर वेदनांचे,
दिसले असते,
मनामनांत डबके,
साचले असते,
पण थिजवले होते,
सगळेच ह्रिदयात तिने,
गोठवले होते,
सगळेच डोळ्यांत तिने,
तृप्त म्हणावे,
कि अतृप्त राहिले सारे,
स्वार्थी सगळे,
तिज स्वार्थी म्हणाले,
वेड्या जगाने,
तिज वेडे ठरवले,
तरीही धडधडती,
म्हातारीची स्पंदने,
कुणा कसे ऐकू न आले,
कि ऐकूनही सारे,
मुके बहिरे झाले,
समजून हे सारे,
खेळ नियतीचे,
म्हातारीने गोठवले,
रक्त स्वत:चे,
अन त्यागले प्राण रे,
केलीत मुक्त बंधने,
फसव्या नात्यांचे,
झटकलीत ओझें,
रिकाम्या श्वासांचे!


मिलिंद कुंभारे
http://britmilind.blogspot.com/

rudra


मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

 स्वासांचे>>>> "श्वासांचे" अस म्हणायचं असाव.
_______________________________________________

'म्हातारीची व्यथा' हा विषय निवडून कविता केली; त्याबद्दल.... "क्या बात है!!"

मिलिंद कुंभारे

thanks madhura tai.
"श्वासांचे" अस म्हणायचं असाव. right..... :)

मिलिंद कुंभारे

thanks kedar dada......

reply after so many days???????? :)

sweetsunita66

अन त्यागले प्राण रे,
केलीत मुक्त बंधने,
फसव्या नात्यांचे,
झटकलीत ओझें,
रिकाम्या श्वासांचे!    मस्तच आहे..nice :)

मिलिंद कुंभारे