तो देव

Started by विक्रांत, June 14, 2013, 12:57:17 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


तो देव इथे राहतो इथेच जगतो
इथल्या जंगलात शहरात फिरतो
इथल्या नदीत स्नान करतो
इथल्या गावी मागून खातो
म्हणूनच तो मला सदैव
आपला असा वाटतो
दूर दूर कुठे ढगात
खोल गहन सागरात
शोधणे आम्हा शक्य नाही
या माती शिवाय मनाला 
अधिक काही माहित नाही
त्याचा बद्दल विचार करता 
हृदय भरून येते
आपलेपण उगा दाटते
त्यामुळेच कदाचित
तो भेटण्याची शक्यता हि वाटते

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


विक्रांत


मिलिंद कुंभारे

दूर दूर कुठे ढगात
खोल गहन सागरात
शोधणे आम्हा शक्य नाही .......

अश्यक्य ते काहीच नाही ....
देव तो तुझ्या माझ्यातच वसतो ......
शोधणे त्यास कठीण नाही ....

:) :) :)