पावसातली मज्जा...

Started by Ankush S. Navghare, Palghar, June 15, 2013, 07:18:43 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कोसळणारा पाऊस
गार गार वारा
वाफाळलेल्या चहासोबत
भज्यांचा मारा..
भिजणारी झाडे
हलणारी पाने
एकमेकांना चिकटून
भिजत भिजत जाणे..
गुडघाभर पाण्यात
अडखळणारे पाय
ढळूनये तोल म्हणून
घट्ट बिलगून राहणे..
मधेच मोठी सर
छत्रीची फडफड
खुप थंडी म्हणून
मिठीत तुझ्या जाणे..
मिठीत तुझ्या येताच
लाजून तुझे हसणे
तुला तसे पाहून
माझे तुझ्यात फसणे..
मग पट्कन झाडाखाली
किवा मग आडोशाला
पावसात भिजत भिजत
प्रेमामध्ये बुडणे..
असे हे जगणे
क्षणमात्र म्हणून
वाटते असेच असावे
रोज रोज चे जिणे...
रोज रोज चे जिणे...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.


Dipti Temkar



Ankush S. Navghare, Palghar


rudra


Çhèx Thakare

मस्त रे मित्रा एकदम झाक

Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar


vijaya kelkar

  व्वा ,व्वा,
फार छान