टपरीच्या बाजूला

Started by विक्रांत, June 16, 2013, 07:45:37 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

टपरीच्या बाजूला
भिंतीच्या आडोश्याला
नुकतीच मिसरूड फुटली
मुले येती सिगारेट प्यायला
काही चुकल्या चुकल्यागत
काही अगदी बेपर्वा
चुटकी वाजवत राख झाडत
धूर सोडती आडवा तिडवा
जणू जातात एकटेच
जगापासून दूर दूर
सभोवती ओढून घेत
निळा पांढरा तो धूर
कुणी तरी येतो उगाच
कुणी आणला जातो ओढून
तंबाखूच्या उग्र गंधात
स्वत:स देती सारे झोकून
पाहता पाहता कोपऱ्यात
पाकिटांचा होतो किल्ला
मोठ्या टाईपात पाटी असतो 
केविलवाणा आरोग्य सल्ला

विक्रांत प्रभाकर             


Madhura Kulkarni

#1
सत्य परिस्थिती.. :(

नशेत जातो वाया,
झिजून जाते काया,
राहत नाही त्यास मग
कशाचीही हया..


बाहेर पडण्याच्या
हरवतात दिशा...
जीव घेउनिया नशा,
करते वाईट दशा..


#चारोळी 

मधुरा कुलकर्णी.

rudra

mastach.....nava yuvatana bodh gheta yel yatun...

rudra


विक्रांत

thanks madhura ,rudra .Like ur charali madhura

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni


Maddy_487


मिलिंद कुंभारे