पाउस

Started by केदार मेहेंदळे, June 17, 2013, 01:43:21 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

देशात येईल ना येईल
कवितांत पडतो पाउस
कधी रिमझिम, कधी मुसळधार
अचानक बरसतो पाउस

सर एखादी येउन गेल्यावर
दडी मारतो पाउस
उकाडा वाढवतो अन सगळ्यांची
हाय घेतो पाउस 

तरुण तरुणींच्या मनात प्रेमाची
गाणी गातो पाउस
नोकरदारांना छत्री अन रखडपट्टीची
आठवण देतो पाउस 

एखाद्याच्या प्रेम कवितेत प्रियेला
मनसोक्त भिजवतो पाउस
विरहात जळणार्या कवीच्या मात्र
डोळ्यांतून वहातो पाउस

शेतकर्यांना वाट पहायला लावून
फासावर लटकावतो पाउस
मागे राहिलेल्यांना पुन्हा एकदा
आशेला लावतो पाउस

जमिनीच्या पोटात दडून बसलेलं
बीज अंकुरवतो पाउस
नवीन हंगामात नवीन अशा
मनात जागवतो पाउस


केदार...


santoshi.world


rudra

kedar saheb.....kay kavita lihili ahet....apratim..
शेतकर्यांना वाट पहायला लावून
फासावर लटकावतो पाउस
मागे राहिलेल्यांना पुन्हा एकदा
आशेला लावतो पाउस


मिलिंद कुंभारे

नवीन अशा
मनात जागवतो पाउस
छान....... :)

sweetsunita66

जमिनीच्या पोटात दडून बसलेलं
बीज अंकुरवतो पाउस
नवीन हंगामात नवीन अशा
मनात जागवतो पाउसमस्तच आहे पाऊस ... :) :)

Maddy_487

एखाद्याच्या प्रेम कवितेत प्रियेला
मनसोक्त भिजवतो पाउस
विरहात जळणार्या कवीच्या मात्र
डोळ्यांतून वहातो पाउस

Waa kedarji waa mastch!

vijaya kelkar

अतिशय आवडली ......
  ज्येष्ठ निरखती खुर्चीत बसून
  आठवणीतला पाऊस
  उचलून भिजल्या लहानग्याला
  पुरवी हौस पाऊस


कवि - विजय सुर्यवंशी.

 अप्रतिम.....