गण गण गणात बोते

Started by Mandar Bapat, June 17, 2013, 05:35:55 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat


गण गण गणात बोते ,गण गण गणात बोते

गोडवा नामात तुझ्या तुझ्यातच एकरूप  होते


तुझ्याविना नाही कोणी मनात माउली

तूच आधार माझा आता तूच सावली

तुझ्या पायी दिन अन ठायी रात होते

अखंड दीप जळता त्याची मी वात होते

गोडवा नामात तुझ्या तुझ्यातच एकरूप  होते

गण गण गणात बोते ,गण गण गणात बोते





तान्हा मी तू बाप माझा तूच माझी आई

तुझ्याविना माझे गणा इथे कोणी नाही

नाही दुजा छंद माझा तुझे नाम जपते

तुझे रूप शेगावीचे बघून धन्य होते

गोडवा नामात तुझ्या तुझ्यातच एकरूप  होते

गण गण गणात बोते ,गण गण गणात बोते

                         
                          ... मंदार बापट

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
तुझी भक्तीची भावना, तुझी कविता मांडते.....


मस्त रे दादा....कविता खूप छान....आवडली...प्रचंड आवडली. मला अश्या भक्तीच्या कविता फार आवडतात. :) :) :)


Mandar Bapat




मिलिंद कुंभारे

तुझ्या पायी दिन अन ठायी रात होते
अखंड दीप जळता त्याची मी वात होते
गोडवा नामात तुझ्या तुझ्यातच एकरूप  होते ....

छान :)

sweetsunita66

अखंड दीप जळता त्याची मी वात होते

गोडवा नामात तुझ्या तुझ्यातच एकरूप  होते  :)छान कविता MANDAAR ,आवडली

Mandar Bapat