लग्नापूर्वीचा सल्ला

Started by विक्रांत, June 18, 2013, 07:55:11 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

मने जुळल्याविना यारो
लग्न कधी करू नका
यात आपल्या आईबापांचे
मुळीसुद्धा ऐकू नका

घर गाडी बंगला त्याचा
भला थोरला असू द्या
वागणे बोलणे दिसणे
कितीही मनी भरू द्या

वर्ष दोन वर्षात त्याचा
सारा रंग उडून जाईल
आज हवा हवासा संग
मग नको नकोसा होईल

उणेदूणे काढता काढता
दिवस जातील उलटून
जीवनपुष्प सुगंधित 
जाईल अकाली सुकून

ग्रंथ गाणी कविता काही
जागा फिरणे खाणे काही
नाटक सिनेमा मित्र वा
झूलॉजीतील किडेबिडेही

असे काही सूर जुळावे
जीवनगाणे एक व्हावे
रंगा मध्ये रंग मिळावे
इंद्रधनुष्य सदा फुलावे

विक्रांत प्रभाकर             



मिलिंद कुंभारे

मस्तच.....

असे काही सूर जुळावे
जीवनगाणे एक व्हावे
रंगा मध्ये रंग मिळावे
इंद्रधनुष्य सदा फुलावे .... :) :D :'(

केदार मेहेंदळे


विक्रांत


शुभांगी

असे काही सूर जुळावे
जीवनगाणे एक व्हावे
रंगा मध्ये रंग मिळावे
इंद्रधनुष्य सदा फुलावे
.
.
मदनबाणांनी हृदयी जर्जर व्हावे
ठिबकते रक्तबिंदू ठरावेत पुरावे

sweetsunita66


विक्रांत

धन्यवाद शुभांगी,sweet sunita