दृष्टीकोन

Started by प्रशांत नागरगोजे, June 19, 2013, 09:32:54 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

....जमलेल्या पैशातून जर एखाद्या भिकाऱ्याने चांगले कपडे खरेदी करून व ते परिधान करून भीक मागण्यास सुरुवात केली तर त्याला नक्कीच उपाशी मरावे लागेल. कारण त्याच्यासाठी जरी तो भिकारी असला तरी दुनियेच्या नजरेत मात्र तो भिकारी राहत नाही.

प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. कोणाला ढगांमध्ये विज्ञान दिसतं, कोणाला मांजर दिसतं, कोणाला ससा दिसतो तर कोणाला दिसतात ते उडणारे पक्षी. वस्तू जरी एकच असली तरी प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून ती वेगळी असते. किमयाच आहे ही.

एखादी व्यक्ती एखाद्यासाठी चांगली असते, तर दुसऱ्याला ती वाईट वाटते. व्यक्ती एकच आहे पण ती दोन प्रकारे दोन अन्य व्यक्तींसमोर उभी राहते. डोळ्यांना दिसणारं चित्र एकच पण दृष्टीकोनातून आशय वेगवेगळा असतो