प्रश्न...

Started by Ankush S. Navghare, Palghar, June 20, 2013, 03:01:37 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

असाच काळ चाललाय
हातातून निसटून
कळत नाही काय करावे
सारेच गेलेय थांबून
आजचे आपले नाते
उद्या परके होईल
तु तुझ्या वाटेने
मी माझ्या वाटेने जाईन
हाती फक्त राहतील
आठवणी त्या क्षणांच्या
पण नुसत्या आठवणी
नसतील काही कामाच्या
रोज त्यांना आठवून
तुझी आठवण येईल
काही चूक नसताना
मन परत उदास होईल
हळू हळू काळ सरेल
ह्या सर्वाचा विसर पडेल
तो पर्यंत सतत
दुःखच मनाला सलेल
कुणीतरी हे थांबउ नाही का शकणार
कुणीतरी म्हणजे तु किवा मी?
सतत प्रश्न पडतो
मनाला पिडतो
हे सर्व असेच असते का?
हे सर्व असेच होते का?
हाच प्रश्न
मला रोज रोज छळतो...
मला रोज रोज छळतो... 

... प्राजुन्कुश
... Prajunkush.


rudra


Ankush S. Navghare, Palghar

Prashantji... Rudraji...
... Dhanyavad.

केदार मेहेंदळे


देवेंद्र

#5
chaan lihila ahes

pan mitra asach asata  :(

Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir... Devendraji...
...Khup abhar.
Bahutek asech asanar.

विशाखा


"तू तुझ्या वाटेने
मी माझ्या वाटेने जाईन"

-----------------------------

"हे सर्व असेच होते का?"
प्राजुन्कुशा, प्रश्न तुझा;
मूलभूत पण प्रश्न असा,
सुचवते मननार्थ तुझ्या -
जाण्यामागे वाटेने आपल्या
नसणार तिचा का असा विचार -
"वाट आपल्या आयुष्याची
लागण्यापूर्वी बरी बदललेली
आपल्या आयुष्याची वाट"?
करता तू तेव्हा तिच्या दृष्टीने
विचार, जाईल तव मन उजळून.

sweetsunita66

जातांना सोडूनी मला परतून मागे बघणार का ?
कासावीस झालाय जीव एकदा फुंकर घालणार का ?
                                   :)छान झालीय कविता प्राजन्कुश !!!!!!!!!!!!

Çhèx Thakare