स्पर्श तुझा कितीक अलगद

Started by Mandar Bapat, June 20, 2013, 06:11:11 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या

आकृती तुझी सदृष्य पापण्याही मिटता डोळ्यांच्या


जाता दूर दूर तू, नाही दूर होत गोड सुगंध

सदैव जसा फुलात असतो प्रेमाचा मकरंद

पावसाळी सर तू,भिजवतेस अंग चिंब चिंब

ओंजळीत झेलता थेंब फक्त तुझेच प्रतिबिंब

अल्लद पडताच  दव फुलतात कळ्या  मनाच्या

स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या




ओझरत पाणी चेहऱ्यावरून ,साचत मनात

प्रीतीची बाग मी हृदयी फुलवतो अनवरत

गवाक्षाला एकेक ओघळणाऱ्या थेंबाचीही वाट

बरसणाऱ्या तुझ्या ओल्या स्पर्शाने झालीया पहाट

भिजवून चिंब  टिपणाऱ्या छेडती  सरी प्रीतीच्या

स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या


स्पर्श तुझा कितीक अलगद ,कळीपरी फुलाच्या

आकृती तुझी सदृष्य पापण्याही मिटता डोळ्यांच्या

                                                  ... मंदार बापट

केदार मेहेंदळे


rudra

बरसणाऱ्या तुझ्या ओल्या स्पर्शाने झालीया पहाट
ol avadli...

aprtim...shabdhrachna....




walekarajay

प्रेमाने तुझ्या मन माझे भिजले क्षणात
तू येशील अलगद माझ्या जवळ
झाला असा भास मज...............!

sweetsunita66

हृदय स्पर्शी कविता ।  :) :)


मिलिंद कुंभारे

पावसाळी सर तू,भिजवतेस अंग चिंब चिंब
ओंजळीत झेलता थेंब फक्त तुझेच प्रतिबिंब.....

kya baat......आवडलंय  :)