नात

Started by aap, June 21, 2013, 02:20:56 PM

Previous topic - Next topic

aap

नात

जेव्हा मी आजी झाले

आकाश मला ठेंगणे झाले

नातीचे लोभस रूप पाहून

डोळे माझे तृप्त झाले

बाळलीला पहाताना

दुडूदुडू चालताना

चिमखडे बोल बोलताना

मन माझे हरखून गेले

लटका रुसवा, अवखळ खोड्या

स्वत; हसून घराला हसवणारी

नात दुधावरची साय , मुद्दलवरचे व्याज

आजी आबांचा साज

                   सौ . अनिता फणसळकर   




sweetsunita66

 :) :) :)छान कविता आहे

vijaya kelkar