समजा मी,मी नसतो

Started by विक्रांत, June 21, 2013, 08:38:27 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

समजा मी,मी नसतो
तर मग मी कोण असतो ?
अर्थात तरीही मी मीच असतो
पण आता जो मी आहे 
तो मी मुळीच नसतो
म्हणजे जो मी मला ओळखतो
तो मी तर मीच असतो
पण ज्याला मी ओळखतो
तो मी तेव्हा वेगळा असतो
त्या वेगळेपणात जेव्हा मी
मी पणे मीहून वेगळा असतो
त्या मी ला हि मीचा प्रश्न पडतो
तेव्हा जो मी मी ला शोधतो
त्या मी लाही मी नच मिळतो
कारण मी चे कळणे न कळणे
मी पणावर अवलंबून नसते

विक्रांत प्रभाकर             

मिलिंद कुंभारे

मी...मी.....मी.....मी.....मीच असतो confused  :-\ :-\ :-\ :-\ :-\

विक्रांत


sweetsunita66

ज्याने गवसले मी पणाला ,
नक्की त्याचा देवच हो झाला  :) :)


केदार मेहेंदळे

ho pan tarihi mi mich asto...chan kavita....