Olya Sanj Veli / ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी

Started by swara, June 21, 2013, 10:39:58 PM

Previous topic - Next topic

swara


ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी  ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी  जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील  या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे 
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत  तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

मिलिंद कुंभारे

ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी  ये जरा

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

खूपच अप्रतिम गाणं आहे.... :)
प्राची
कुठले आहे .......


मिलिंद कुंभारे


vinod.shirodkar111



Lyrics Swapnil Chatge

खूपच अप्रतिम गाणं आहे.स्वप्नील बादोडकरानी खुपच छान रचना केली आहे अन् गायलँ पण आहे.
त्याचासोबत बेला शेडे नेही खूपच छान साथ दिली.
खरचं लयभारी...!!