चक्रव्युह..

Started by Rohit Dhage, June 22, 2013, 12:03:29 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

आता असं वाटतं
प्रेम कधी झालंच नव्हतं मुळी
जे चालायचे ते आपल्याच मनाचे खेळ
ते दिसायचं ते असायचं फक्त मृगजळ
आणि त्या मृगजळाला पाणी करायचं ज्ञान
नाहीच पदरी पडलं आजपर्यंत..
चक्रव्युहातल्या अभिमन्युसारखा रस्ताच शोधत राहिलो आयुष्यभर
हाती अर्धवट ज्ञान घेऊन घुसत राहिलो.. आयुष्यभर.. त्याच त्या चक्रव्युहात
आणि फसत राहिलो ऐन मोक्याच्या क्षणी.. हृदयावर वार झेलून
दु:ख हरल्याचं कधीच नव्हतं मला
दु:ख राहील ते स्वप्ने अधुरी राहिल्याचं
ज्या जोशानी रस्ता शोधत आलो तो जोशच ओसरल्याचं
ज्यांना खुल्या मैदानात उभा न राहू देऊ त्यांनीच मैदान मारल्याचं
आता मुरलेलो आहोत कि पुरून उरलेलो
हेही गणित आज अधुरंच आहे..

- रोहित

rudra

rohit....mitra kavitecha ashay farach sundar aahe....
pan kavitemadhe shabdh far kami vaparle jatat....
kami shabdht barach kahi samjavaych ast....

Rohit Dhage

ho pan tumhala mhanaycha kay hota.. mla samajala nahi  ::)

मिलिंद कुंभारे

#3
रोहित.....
कमी शब्दांत म्हणजे कदाचित असं लिहायला हवं होतं ...... बघ तुला आवडतंय का ...
मात्र तुझं असं भावूक होवून लिहिणं आवडलंय ......


ते प्रेम होतं
कि होते नुसतेच
मनाचे खेळ,
मृगजळ होतं
कि होतं,
एक चक्रव्युह,
अर्धवट आयुष्य,
अन फसवे क्षण,
हरल्याच दु:ख,
कि गणित चुकलेलं
अधुरं एक स्वप्न,
कि नुसताच आभास!

:) :) :)

Rohit Dhage

मात्र तुझं असं भावूक होवून लिहिणं आवडलंय ... :D
upalabdh kavyasangrahavarun 4 shabda jodun banavlelyala kavita nahi julavajulav mhantat asa mla vatata मिलिंद कुंभारे.. anyways.. chan jamlay tumhala  8)

मिलिंद कुंभारे

रोहित.....

अरे शब्दांची जुळवाजुळव अन त्यात भावनेचा स्पर्श ह्यालाच तर कविता म्हणायची ......
नाही काय ??????

मी हे काय लिहिलंय ते तुझेच शब्द अन तुझ्याच भावना ......
त्याखाली मी काय माझे नाव नाही टाकलेले ....

कमी शब्दांत म्हणजे कसं लिहायला हवं होतं .......हा तुला सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता
Anyways.......I like it...... :-X

Rohit Dhage

ok then
will u plz tel me what to do with these two poems given below
http://mitttttt.blogspot.in/2012/09/blog-post_15.html
http://mitttttt.blogspot.in/2013/01/love.html

apan hyanna kavita mhanaycha ka lekh ghoshit karun takaycha he amhala jarur kalva :)
Dhanyawad.......

मिलिंद कुंभारे

both the poems are nice........but in your current poem चक्रव्युह..something is missing.....pl don't take it otherwise....add that spice of your previous poems in this too......I will like to enjoy it.......

don't worry......be happy always.......

छान कविता .... धडा नाही वाटत...... :)

Çhèx Thakare

dud hrudayala bhedalas aaj maza tu dilelya upama atishay chhan hotya n abhimanyu n chakravivyu ne mala mrutunjay chi athavan karun dili :-)