नातीचा आजीला प्रश्न

Started by aap, June 22, 2013, 02:33:52 PM

Previous topic - Next topic

aap

नातीचा आजीला प्रश्न 

एक नात आजीला म्हणाली मुलीनेच का नेहमी सासरी जायचे ?

आपली माणसं सोडून तिनेच कां परक घरआपलं मानायचं ?

तिच्याकडूनच कां अपेक्षा जुने अस्तित्व विसरायची ?

तिच्यावरच कां जबरदस्ती नवीन नाव वापरायची ?

आजी म्हणाली अग वेडे हा तर सृष्टीचा नियम आहे नदी नाही कां जात सागराकडे आपल घर सोडून

तो येतो कां कधीतरी तिच्याकडे आपली वाट सोडून  तिचे पाणी किती गोड तरी ती सागराच्या पाण्यात

मिसळते . आपलं अस्तित्व सोडून त्याचीच बनून जाते एकदा सागरात विलीन झाल्यावर ती हि सागरच होते

पण म्हणून तिच्या पुढेच नतमस्तक होतात लोक पाप धुवायला समुद्रात नाही गंगेत जातात लोक

                                                                    संग्रहित

                                                              सौ . अनिता फणसळकर           

sweetsunita66