भयाकुळ पावूस

Started by विक्रांत, June 22, 2013, 11:08:54 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

सावळ्या लाटा आकाशी बेफान
सडसडते आसूड फुटती धारातून
रानटी वारा धावे पिसाटून
कानात पाशवी भेसूर घोंगावून
वृक्ष कडाडत पडले उन्मळून
हिरव्या वेलीही भरल्या कुंकवान
धुकट काळोख सर्वत्र झिरपून
चिंतेचे सावट दाटले विषण्ण
काळीज फाटे विजा चमकून
कापरे देहात मेघ गडाडून
पक्षांची घरटी मातीत पसरून
शोधती निवारा कुठे फडफडून 
गोठ्यात गुरे निश्चल थबकून 
भयाची सावली सर्वत्र दाटून
दार अंगण जलमय होवून
वाहते घरदार वाटते चमकून 
पडवीच्या पत्र्याचे तांडव वादन
शब्द रवात गेले हरवून
कुण्या घराचा पत्राही उडून
पडे कडाडत अंगणी येवून
ठिबकू लागली कौल कुठून
भांड्यांनी घर गेले भरून 
कधी सांजावले आले नाकळून
सर्वांगाचे मग होऊन कान
उरे कानोसा भये थिजून
देवा विठोबा वाचव यातून
हतबल शरण चिंतीत मन

विक्रांत प्रभाकर             




rudra

vikrant.....shabdarachana far sundar aahe.....

विक्रांत

thanks विजयाजी ,प्रशांत, rudra.

sweetsunita66


पूर्ण उत्तेराखंडात हीच परिस्थिती आहे ।  छान अवलोकन आहे ।  :( :( :(